सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:45 PM2020-08-23T16:45:50+5:302020-08-23T16:47:04+5:30

खासदार रक्षा खडसे यांच्या दणक्याने अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेला मध्यप्रदेश पोलिसांचे तपासणी नाका रविवारी हलवण्यात आला आहे.

The border checkpoint was finally shifted to Madhya Pradesh | सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला

सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला

googlenewsNext

मुनाफ शेख
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : खासदार रक्षा खडसे यांच्या दणक्याने अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेला मध्यप्रदेश पोलिसांचे तपासणी नाका रविवारी हलवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशाच्या सीमा बंद करण्यासाठी अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी मध्यप्रदेश पोलिसांनी सीमा तपासणी नाके उभारले होते. या नाक्यावर कर्त्यव्यास असलेल्या पोलिसांमुळे अंतुर्ली परीसरातील नागरिकांना मुक्ताईनगर, जळगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी कमालीचा त्रास होता. या तपासणी नाक्यावरून रुग्णांच्या वाहनालाही जाऊ न दिल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या. अंतुर्ली शिवाराची सुमारे पाचशे एकर शेत जमीन या भागात आहे. यामुळे शेतकरी, मजूर वर्ग, केळी माल पाहण्यासाठी जाणारे केळी व्यापारी, मुक्ताईनगर येथे शासकीय कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना तपासणी नाक्यावरील पोलीस त्रास देऊन जाऊ देत नव्हते. यावर खासदार रक्षा खडसे यांना ही माहिती दिली. त्यांनी अंतुर्ली फाट्यावरील तपासणी नाक्यावर आल्या. शाहपूरचे पोलीस निरीक्षक संजय पाठक यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून बºहाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. अखेर हा तपासणी नाका हलवण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्यासोबत राजू माळी, प्रशात महाजन, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, सरपंच नरेंद्र दुट्टे, ताहेर खा, सुनील पाटील, कैलास दुट्टे उपस्थित होते.
शिरसोला येथे हलविला नाका
मध्यप्रदेशाचा सीमा तपासणी नाका महाराष्टÑाच्या हद्दीत अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या दोन ठिकाणी होता. तो आता मध्य प्रदेशच्या हद्दीत इच्छापूर-शाहपूर दरम्यानच्या रस्त्यावर शिरसोला फाटा (ठिक्का) या ठिकाणी हलवण्यात आला आहे.

Web Title: The border checkpoint was finally shifted to Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.