बोदवडच्या नगरसेवकाकडून विक्रेत्याला मारहाण

By Admin | Updated: June 25, 2017 12:23 IST2017-06-25T12:23:19+5:302017-06-25T12:23:19+5:30

चार जणांविरूद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल

Bond board corporator assaulted the seller | बोदवडच्या नगरसेवकाकडून विक्रेत्याला मारहाण

बोदवडच्या नगरसेवकाकडून विक्रेत्याला मारहाण

 ऑनलाईन लोकमत 

बोदवड,दि.25 : शहरातील  आंबेडकर चौकातील  पाणीपुरी विक्रेता व नगरसेवक सुनील बोरसे यांच्यात 24 रोजी रात्री 8 वाजता वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. घटनास्थळी मोठा जमाव  झाला होता. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने परिस्थिती निवळली. दरम्यान, नगरसेवक बोरसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  
 प्रभाग क्र.12 चे नगरसेवक बोरसे व  सोबत अमोल बडगुजर, शरद जगताप हे  पाणीपुरी विक्रेता मोहन रमेश शिरसाठ यांच्यात अॅक्वासेंटरवर मृत जनावरे कापून खाल्ले यावरुन वाद झाला. त्यात शिरसाठ यांना नगरसेवक   बोरसे व  बडगुजर, शरद जगतापसह आदींनी मारहाण केली. शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून  भादंवि कलम 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तपास दिनकर धायडे करीत आहे. 

Web Title: Bond board corporator assaulted the seller