कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये बॉम्ब!

By Admin | Updated: November 4, 2015 00:01 IST2015-11-04T00:01:25+5:302015-11-04T00:01:25+5:30

अफवा : शाळेच्या दूरध्वनीवर निनावी फोनवरून धमकी, बॉम्बशोधक पथकाची तपासणी

Bomb at Kanosa Convent School | कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये बॉम्ब!

कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये बॉम्ब!

धुळे : वेळ साधारण सकाळी 11 वाजून 20 मिनिटांची.. कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलच्या कार्यालयातील दूरध्वनी खणाणला.. पलीकडून बोलणा:या अज्ञात व्यक्तीने तुमच्या शाळेत बॉम्ब ठेवला आहे, 10 मिनिटात स्फोट होईलअशी हिंदीत धमकी दिल्याने सर्वाच्या पायाखालची जमीन सरकली. शाळेच्या प्रशासनाने या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस अधिका:यांच्या फौजफाटय़ासह बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर शाळेत बॉम्ब नसल्याची खात्री पटल्याने सर्वाचा जीव भांडय़ात पडला.आपके स्कूल में बॉम्ब रखा हैं, दस मिनट में बॉम्ब फटेगाअसे सांगितले. सिस्टर सिल्विया यांनी कोण बोलताय? असे विचारले. परंतु त्या व्यक्तीने तत्काळ फोन ठेवला. या प्रकाराची माहिती सिल्विया यांनी लागलीच स्कूलच्या प्राचार्या सिस्टर रुथ यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क केला.लुसी व स्टेफीया दोन प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने कसून चौकशी केली. सुमारे दोन तास ही तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही आक्षेपार्ह वस्तू त्यात आढळून आली नाही. खात्री पटल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने शाळेत बॉम्ब नसल्याचे जाहीर केले.

एखादी आणीबाणीची घटना घडली तर यंत्रणा किती तत्पर आहे, याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांकडून मॉकड्रील केले जाते. कनोसा हायस्कूलमध्ये घडलेला प्रकारदेखील मॉकड्रीलच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

शिक्षक रमले चेष्टामस्करीत

शाळेत बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू असताना कनोसा हायस्कूलचे काही शिक्षक चेष्टामस्करीत रमल्याचे चित्र होते. शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी निनावी फोनवरून आली होती. सुदैवाने ती अफवा ठरली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. परंतु याचे गांभीर्य शिक्षकांना नसल्याचे समोर आले.

मॉकड्रीलची चर्चा

शहरातील चाळीसगाव रस्त्यावर असणा:या कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजेनंतर घडला. कनोसा हायस्कूलच्या (282680) क्रमांकाच्या दूरध्वनीवर 11.20 वाजेच्या सुमारास एक निनावी फोन आला. हा फोन शाळेतील सिस्टर सिल्विया यांनी रिसिव्ह केला. पलीकडून बोलणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. त्याने

कसून चौकशी

कनोसा स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, बॉम्बशोधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत सोनार घटनास्थळी दाखल झाले. शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व विद्याथ्र्याना वर्गातून मैदानावर नेले. त्यानंतर शाळेच्या संपूर्ण परिसरात बॉम्बशोधक पथकाने अत्याधुनिक उपकरणे, तसेच

यांनी केली तपासणी

बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत सोनार, पोलीस हवालदार सुरेश कोडगीर, वसंत गोंधळी, पोलीस नाईक किरण निकम, गोपाल सत्येसा, पोलीस शिपाई सत्तरसिंग खतावद, राकेश ठाकरे, संजीव ठाकरे, वसियोद्दीन शेख, हिरालाल वाल्हे यांच्यासह दहशतवादविरोधी पथकाचे अब्दुल्ला शेख, पठाण, माळी, मन्सुरी, सिसोदे यांनी तपासणी केली.

पालकांनी केली गर्दी

बॉम्बचे वृत्त वा:याच्या वेगाने शहरात पसरले. त्यामुळे धास्तावलेल्या पालकांनी कनोसा हायस्कूलजवळ एकच गर्दी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हायस्कूलचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बॉम्ब नसल्याचे जाहीर केल्यानंतर पालकांची भीती दूर झाली.

Web Title: Bomb at Kanosa Convent School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.