भडगाव गिरणा नदीवरचा पूल झाला बोलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:38+5:302021-06-16T04:22:38+5:30
भडगाव गिरणा नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल असून वर्षानुवर्षापासून दळणवळणासाठी व वाहनधारकांसाठी, तालुका व जिल्ह्यासाठी, परजिल्ह्यासाठी दुवा ठरत आहे. दोन ते ...

भडगाव गिरणा नदीवरचा पूल झाला बोलका
भडगाव गिरणा नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल असून वर्षानुवर्षापासून दळणवळणासाठी व वाहनधारकांसाठी, तालुका व जिल्ह्यासाठी, परजिल्ह्यासाठी दुवा ठरत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या दुतर्फा भिंत आदींच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते. मागील वर्षी पावसाळ्यात या पुलावरून पावसाचे पाण्याच्या पुरामुळे या पुलावर छोट्या-मोठ्या खड्ड्यांचे जाळे पसरलेले होते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? अशी दयनीय परिस्थितीने हा पूल घाव सोसत होता. वाहनधारकांना रस्ता काढणे मोठ्या जिकिरीचे ठरत होते.
या पुलावरील तसेच रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी. अशी मागणी करणारे वृत्तही ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
बांधकाम विभागाने नुकतेच या पुलावरील रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करून पुलावरच्या रस्त्याचे सलग डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या हा रस्ता वाहनधारकांसह पायी वापरणाऱ्या नागरिकांसाठी सोयीचा ठरत आहे. पुलावरील दुतर्फा असलेले साखळ्यांसह कठडे दुरुस्त झाले आहेत. या कठड्यांना आकर्षक रंगरंगोटी केल्याने हा पूल बोलका झाल्याचे दिसत आहे.
150621\15jal_3_15062021_12.jpg
भडगाव ते पेठ गिरणा नदीवरचा हाच तो पूल.