पारोळा येथे बोहरा शाळेत ४०० विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:25+5:302021-09-13T04:16:25+5:30
सकाळी १० वाजेपासून जळगाव, शिरपूर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन उपस्थित होते. यामुळे बोहरा शाळेच्या परिसरात या ...

पारोळा येथे बोहरा शाळेत ४०० विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा
सकाळी १० वाजेपासून जळगाव, शिरपूर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन उपस्थित होते. यामुळे बोहरा शाळेच्या परिसरात या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांची तपासणी करून आत सोडण्यात येत होते. पेपर सुरू झाल्याबरोबर परीक्षार्थी व त्याचा रोल नंबर असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शूट करण्यात आले. यावेळी पावसाची अधूनमधून हजेरीदेखील सुरू होती.
विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांची स्वतंत्र इमारतीत निवासाची व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी करून दिली होती. महिला व पुरुषांसाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था केल्याने या पालकांनी सुरेंद्र बोहरा यांचे खूप कौतुक करीत आभार मानले. केंद्रासभोवती १०० मीटर अंतरावर सुरक्षा कठडे लावण्यात आले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी होता. निरीक्षक म्हणून यांनी काम पाहिले तर केंद्रसंचालक म्हणून शाळेच्या प्राचार्या शोभा सोनी तर उपकेंद्रसंचालक म्हणून विरेंद्र सखा, अविता पाटील यांनी काम पाहिले.
120921\12jal_5_12092021_12.jpg
झाली एकदाची नीट परीक्षा विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास