समाजमंदिरावर आढळला युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 17:48 IST2017-08-08T17:48:19+5:302017-08-08T17:48:44+5:30
आत्महत्या की घातपात याबाबत उपस्थित होत आहेत प्रश्न

समाजमंदिरावर आढळला युवकाचा मृतदेह
ऑनलाईन लोकमत यावल,दि.9 - तालुक्यातील शिरसाड येथील जाकीर सिकंदर तडवी ( वय 22) या तरुणाचा समाजमंदिरावर मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शिरसाड येथील शेतमजूर तरुण जाकीर तडवी नेहमीप्रमाणे सोमवारी त्याच्या घरासमोरील तडवी पंचायत समाजमंदिरात झोपायला गेला होता. मंगळवारी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. जाकीर तडवी सुस्वभावी होता. त्याचे व कुटुंबियांचे गावात चांगले संबंध होते. त्यामुळे जाकीरची आत्महत्या की हत्या याबाबत चर्चा सुरु आहे. पोलीस पाटील चंद्रकांत इंगळे यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.