शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला १६ तासांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 16:58 IST

तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह तब्बल १६ तासांनी म्हणजे सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. पाण्यात फुगून तरंगत वर आल्याने गावकºयांच्या निदर्शनास आला. दरम्यान, चेतनच्या मृत्यूविषयी कुटुंबाने शंका निर्माण केली आहे, त्यामुळे शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाण्यात फुगून आला वरव्हिसेरा राखीव

जळगाव : तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह तब्बल १६ तासांनी म्हणजे सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. पाण्यात फुगून तरंगत वर आल्याने गावकºयांच्या निदर्शनास आला. दरम्यान, चेतनच्या मृत्यूविषयी कुटुंबाने शंका निर्माण केली आहे, त्यामुळे शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.कातांई बंधाºयात रविवारी दुपारी साडे तीन वाजता पाय निसटल्याने चेतन अरुण पाथरवट व सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) हे दोन तरुण बुडाले होते. त्यात सागर याला वाचविण्यात यश आले होते तर चेतन बेपत्ताच होता. पट्टीच्या पोहणाºयांमार्फत त्याचा शोध घेण्यात आला होता, मात्र तरीही तो न सापडल्याने रात्री आठ वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळी ७.३० वाजता घटनास्थळापासून काही अंतरावर चेतनचा मृतदेह फुगून पाण्याच्यावर आलेला होता. तेथे १५ फूट खोल खड्डा होता. तालुका पोलीस स्टेशनचे सहायक  निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हळणोर व सहकाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. दुपारी दोन वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.कुटुंबाचा आक्षेपचेतन याच्या मृत्यूबाबत कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. सहायक निरीक्षक गणेश चव्हाण यांनी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत घातली. तरीही आक्षेपामुळे मृत्यूचे मुळ कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला असून तो प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन हा गेल्या काही दिवसांपूर्वीच बॅँक आॅफ महाराष्ट्रमध्ये कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव