बोरी पात्रात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:07 IST2019-09-28T21:07:41+5:302019-09-28T21:07:46+5:30
पारोळा : धामणगाव येथील शेतकरी शरद पाटील यांचा मृतदेह बोरी धरणात शनिवारी मिळून आला. २६ रोजी शरद पाटील हे ...

बोरी पात्रात आढळला मृतदेह
पारोळा : धामणगाव येथील शेतकरी शरद पाटील यांचा मृतदेह बोरी धरणात शनिवारी मिळून आला.
२६ रोजी शरद पाटील हे आपल्या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. यावेळी ते हात-पाय धुण्यासाठी धरणाच्या काठावर गेले असता त्यांचा पाय घसरून ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
ग्रामस्थांनी धामणगाव, निमगूळ, वेल्हाने, ढोली परिसरातील पाणी साठ्यात शोध घेतला असता त्यांना शरद पाटील यांचा मृतदेह २८ रोजी १२ वाजेच्या सुमारास तामसवाडी कॅनॉल गेटजवळ आढळला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले आहेत. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.