मुक्ताईनगरच्या जंगलात मृतदेह आढळला
By Admin | Updated: June 28, 2017 12:58 IST2017-06-28T12:58:41+5:302017-06-28T12:58:41+5:30
वायला येथील जंगलात बुधवारी मृतदेह आढळून आला.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरच्या जंगलात मृतदेह आढळला
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.28- तालुक्यातील वायला येथील जंगलात बुधवारी मृतदेह आढळून आला.त्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
मुक्ताईनगर तालुक्यातील वायला येथील जंगलात एका इसमाचा मृतदेह या भागात येणा:या काही जणांना दिसला. त्यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांना माहिती दिली. एखाद्या जंगली श्वापदांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती मरण पावली असावी असा अंदाज आहे. पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. चौकशी दरम्यान मृतदेहाची ओळख पटणार आहे.