शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडचा टांगा व्यवसाय इतिहासजमा होण्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:15 IST

ब्रिटीश काळापासूनची ‘ओळख’ जपताय चार-पाचच जण

गोपाल व्यास ।बोदवड : शहरात ब्रिटिशकाळापासून टांगे चालत असल्याने या ठिकाणी घोडागाडी ही एक ओळख निर्माण झाली होती. बोदवडची त्याकाळी कापड व्यवसायाची बाजारपेठ ही घोडागाडी माल वाहतुकीसाठी टांग्यांवरच अवलंबून होती, आज मात्र ही विशेष ओळख इतर वाहने आल्याने इतिहास जमा होण्यावर आहे.सन १९२७ मध्ये बोदवड रेल्वेच्या स्थानकांवर ब्रिटिश शासन असताना नागपूर मुंबई -एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्याचे थांबे होते. सदरच्या गाड्यांनी अनेक प्रवासी ये-जा करीत. त्यामुळे त्याकाळी स्टेशन ते बोदवड गावात येण्यासाठी प्रवाशांना बसेस तसेच दळणवळणाची ईतर साधने नसल्याने नागरिक घोडागाडीचा वापर करीत असत.यासाठी दररोज ऐंशीच्या जवळपास घोडागाड्या बोदवड शहरात होत्या. वरणगावचा तसेच बोदवडचा बाजार यासाठीही त्याकाळी टांग्याचा वापर होत असे.आजूबाजूच्या गावातून नागरिक स्टेशन पर्यंत पायी येत व स्टेशन वरून घोडागाडीने बोदवडला येत. तसेच जळगाव व इतर ठिकाणीच्या सूत गिरण्यांच्या खादी कापडाचे तागे हे बोदवड रेल्वे स्थानकवर उतरत व टांग्यानी हे कापड बोदवडच्या कापड व्यावसाईक पोहोच होत असे.अगदी सुरुवातीला बोदवड ते नाडगावसाठी सर्वप्रथम टांगे हे उखरडू महाजन, नारायण शिकारी आदींचे होते.सुरुवातीस होते एकआणा भाडेत्यावेळेस अगदी सुरुवातील एक आणा प्रती प्रवासी भाडे होते. त्यानंतर काळानुसार भाडे वाढत जाऊन दहा पैसे, चार आणे, एक रुपया प्रती प्रवासी असे भाडे आकारले गेले. सध्या हा दर दहा रुपये असा आहे. तर त्या काळी वीज नसल्याने घोडागाडीवर रॉकेल चे कंदील लावलेले असत. बोदवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ टांगा स्टँड होता व आज ही जुने जाणते या चौकाला टांगा स्टँड म्हणून ओळखतात.टांग्यानाही मिळत होते परवानेत्याकाळात असलेल्या टांग्याना जळगाव उपविभागीय कार्यालय कडून परवाना मिळत होता. त्यासाठी सर्व टांगे हे बोदवडला सजवून रांगेतकेले जात होते. जो टांगा सर्वाधिक चांगला त्याला पहिला क्रमांक. याप्रमाणे टांग्याना क्रमांक दिले जात होते,हक्काची जागा मिळावीबोदवड ला असलेला टांगा स्टँड आता नगरपंच्यात झाल्यापासून तेथून हटविण्यात आला असून,त्यांना हक्काची जागा हवी अशी मागणी टांगा चालक मालक संघटनेची आहे. सन १९६४पासून आजतागायत चार आणे भाडे आकारून टांगा हाकणारे देवराव कºहाडे हे आजही हा व्यवसाय जोपासत असून त्यांनी सांगितले की, आम्हाला बोदवड शहरात टांगे लावण्यास जागा मिळत नाही व आमच्या पूर्वीपासूनच्या हक्कच्या जागेवर आम्हाला उभे राहू दिले जात नसल्याने आम्ही टांगा चालक मालक संघटनेकडून सुधीर पाटील, शे उस्मान शे मेहमूद, कैलास फाटे, उत्तम माळी आदींनी निवेदन दिले असून आम्हाला किमान दोन टांगे उभे राहतील अशी जागा मिळावी ही मागणी आहे.