बोदवडकरांची पाण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 18:49 IST2021-04-03T18:49:20+5:302021-04-03T18:49:25+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला मदतीचा हात, पाच टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

बोदवडकरांची पाण्यासाठी धडपड
बोदवड : शहरात पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहे. पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची अक्षरश: धडपड सुरु आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाच टॅंकरद्वारे शहरवासियांना पाणी पुरवठा सुरु केला असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी बोदवड शहरासह तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणे हे जणू पाचवीलाच पुजलेले आहे. तालुक्यात एकही मोठे धरण अथवा नदी नसल्याने ही परिस्तिथी नेहमीचीच आहे. दरवर्षी नागरिकांना किमान वीस दिवस आड पाणी मिळते. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत कधी शेतातून तर कधी पाण्यासाठी पाईप लाइन च्या गळतीवर भांडे लावून पाणी आणावे लागते. अशावेळी भांडणेही होतात. तसेच खासगी टँकरचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असून, या पाणी टंचाईतून गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी बोदवड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या दुष्काळ निवारण समितीच्या वतीने एक टँकर माझ्या कडून ही कल्पना राबवली व त्यातून तालुक्यातील जंगल शिवारचे पाणवठे, तसेच टंचाईग्रस्त गावात पाणी पुरविले. त्यांच्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद देत अनेक संस्थांनी हातभार लावला असून यंदाही रा. स्व. संघच्या बोदवड शाखेकडून येथील पाणी समस्या गंभीर होत असल्याने त्यांना धीर देण्यासाठी पुन्हा पदरमोड करत कर सुरू केले आहे.