राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे बोदवडला निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:56+5:302021-09-15T04:20:56+5:30
बोदवड : महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी निषेध करून ...

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे बोदवडला निषेध आंदोलन
बोदवड : महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी निषेध करून आंदोलन करण्यात आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वंदना पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा खोसे, उपाध्यक्ष कविता गायकवाड, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक कैलास चौधरी, दीपक झांबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मुकेश कऱ्हाळे, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. आसाराम काजळे, जिल्हा सरचिटणीस विजय चौधरी, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, शेख सलामोद्दीन, संजय निकम, हकीम बागवान, ईजहार शेख, श्रावण बोदडे, विनोद पाडर, हर्ष कोटेचा, अरुण मोरे, रवींंद्र खेवलकर, शळके, निना पाटील, सुकलाल गंगतीरे, दीपक माळी, शेख जुनेद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.