बोदवडमध्ये किराणा दुकान फोडून चिल्लर लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:36+5:302020-12-04T04:43:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : शहरातील मलकापूर रस्त्यावर असलेले रुपम प्रोव्हिजन हे किराणा दुकान ३० रोजी रात्री चोरट्यांनी फोडले ...

In Bodwad, a grocery store was blown up and a chiller was set up | बोदवडमध्ये किराणा दुकान फोडून चिल्लर लांबवली

बोदवडमध्ये किराणा दुकान फोडून चिल्लर लांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क

बोदवड : शहरातील मलकापूर रस्त्यावर असलेले रुपम प्रोव्हिजन हे किराणा दुकान ३० रोजी रात्री चोरट्यांनी फोडले त्यातून ३० हजारांची चिल्लर लांबवली.

चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली व गल्ल्यातील ३० हजारांची चिल्लर लांबवली. दुकानातील इतर साहित्य मात्र ‘जैसे थे’ आहे. याबाबत बोदवड पोलिसात कोणतीही नोंद झालेली नसल्याचे सांगण्यात आले

----

पं. स.सभापतीच्या निवासस्थानी चोरी

पाच हजार ८०० रुपयांचा माल लंपास

भुसावळ : येथील पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून, यात इलेक्ट्रिक मोटार, गॅस सिलिंडर आदी साहित्य लंपास केले आहे. सभापती पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभापती पाटील यांचे शासकीय निवासस्थान शहर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर तार ऑफिस रोडलगत आहे. सभापती पाटील या कधीकधी या निवासस्थानात आरामासाठी थांबतात. मात्र पंचायत समितीला दोन-तीन दिवसांच्या असलेल्या सुट्टीची संधी साधून चोरट्यांनी २७ रोजी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व एक हजार पाचशे रुपये किमतीचे गॅस सिलिंडर, एक जुनी इलेक्ट्रिक मोटार व जुने नळ असा एकूण पाच हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सभापती पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ.सुपडा पाटील करीत आहेत.

Web Title: In Bodwad, a grocery store was blown up and a chiller was set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.