विहिरीत आढळला तरूणीचा मृतदेह
By Admin | Updated: October 3, 2024 17:47 IST2014-09-18T23:08:13+5:302024-10-03T17:47:19+5:30
तळेगाव दिघे : शेतातील विहिरीच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळल्याने आजमपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

विहिरीत आढळला तरूणीचा मृतदेह
तळेगाव दिघे : शेतातील विहिरीच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळल्याने आजमपूर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
पोलिसांची माहिती अशी, गुरूवारी सकाळी आजमपूर येथील शेतकरी सूर्यभान पंढरीनाथ दिघे यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यात निता भाऊसाहेब दिघे (वय २०, रा. आजमपूर) या तरूणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस पाटील दत्तू किसन इल्हे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ए.व्ही. जांभूळकर करीत आहेत. (वार्ताहर)