शिरसोली शिवारात आढळला पुन्हा मृतदेह

By Admin | Updated: July 12, 2017 12:23 IST2017-07-12T12:23:13+5:302017-07-12T12:23:13+5:30

सोनवणे यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे.

The bodies found in Shirasoli Shivar | शिरसोली शिवारात आढळला पुन्हा मृतदेह

शिरसोली शिवारात आढळला पुन्हा मृतदेह

नलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - तालुक्यातील शिरसोली प्र.न.शिवारात मंगळवारी सायंकाळी अशोक धना सोनवणे (वय ४८, रा.इंदिरा नगर, शिरसोली ता.जळगाव) या प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या शंभर फुटावर एक विषाची बाटली आढळून आली असून त्यात फक्त दहा टक्के विष शिल्लक आहे, त्यामुळे सोनवणे यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे.अशोक सोनवणे उर्फ भील हे इंदिरा नगर भागात पत्नी वानुबाई, मुलगा राहुल, ईश्वर, विनोद, प्रकाश, मुलगी दुर्गा व गिता यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या चार दिवसापासून ते घरातून निघून गेले होते. ते नेहमीच घरातून जात होते, मात्र काही दिवसांनी परत येत असल्याने आताही परत येतील या आशेवर कुटुंबानी त्यांच्या हरविल्याची तक्रार केली नव्हती. मंगळवारी नेव्हरे मारुती परिसरात पंडित देवचंद पाटील (रा.शिरसोली) व सुनील भोळे (रा.जळगाव) यांच्या शेताच्या बांधावर अशोक यांचा मृतदेह बकºया चारणाºया तरुणांना आढळून आला. मृतदेहाची दुर्गंधी येत होती. त्यांनी ही बाब गावातील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी व शरद पाटील यांना सांगितली. दोघांनी सोनवणे यांच्या मुलांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिसांना घटनेची माहिती दिली.आत्महत्येचे कारण अस्पष्टघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, निरीक्षक सुनील कुराडे, उपनिरीक्षक रोहन खंडागळे, बाळकृष्ण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिवाराची चौकशी केली असता त्यांनाही आत्महत्येचे कारण सांगता आले नाही. दरम्यान, सोनवणे हे मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होते. उन्हाळ्यात ते पुणे जिल्ह्यात परिवारासह विटा पाडण्यासाठी गेले होते. दीड महिन्यापूर्वीच ते गावाला परत आले होते.महिनाभरातील चौथा मृतदेह शिरसोली शिवारात महिनाभरात चार मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात १२ जून रोजी शामा फायर फटाक्याच्या कारखान्याच्या मागे ताराचंद जंगलु भील (वय ३५ रा.म्हसावद) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

Web Title: The bodies found in Shirasoli Shivar