बोदवडला मजुराचा दगडाने ठेचून खून
By Admin | Updated: April 28, 2017 13:06 IST2017-04-28T13:06:10+5:302017-04-28T13:06:10+5:30
ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करणारा गोपाळ उर्फ जंम्बो माळी (वय 50) या इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

बोदवडला मजुराचा दगडाने ठेचून खून
बोदवड,दि.28- ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करणारा गोपाळ उर्फ जंम्बो माळी (वय 50) या इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खूनाची ही घटना शुक्रवारी पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसले तरी गोपाळ माळी व त्याचा मुलगा हे रात्री सोबत होते व त्यांनी सोबत मद्य सेवन केले होते, असे सांगण्यात आले.
गोपाळ माळी याचा मृतदेह शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील गल्लीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. खून झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.