ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST2021-02-05T05:50:33+5:302021-02-05T05:50:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी(ग.स.) वर जिल्हा सहाय्यक निबंधकांनी प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली आहे. ...

Board of Directors of G.S. dismissed | ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त

ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी(ग.स.) वर जिल्हा सहाय्यक निबंधकांनी प्राधिकृत मंडळाची नियुक्ती केली आहे. सहाय्यक निबंधक विजय गवळी यांच्या अध्यक्षतेत हे प्राधिकृत मंडळ काम करणार आहे. सहा महिने किंवा निवडणूक होईपर्यंत हे मंडळच ग.स.चा कारभार हाकणार आहे.

बहुसंख्य संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर ग.स.चे उरलेले संचालक मंडळ मंगळवारी बरखास्त करण्यात आले. आणि त्यावर सहाय्यक निबंधक विजय गवळी, भाऊसाहेब महाले आणि लेखा परीक्षक प्रशांत विरकर यांची या प्राधिकृत मंडळात नियुक्त करण्यात आली आहे.

या संस्थेची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या संस्थेचे कामकाज हे प्राधिकृत मंडळ पाहणार आहे. ग.स.च्या संचालक मंडळाने अध्यक्ष मनोज पाटील यांच्या कामकाजाला कंटाळून राजीनामे दिले. बहुसंख्य संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर या संस्थेचे काम पाहणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत होता.

Web Title: Board of Directors of G.S. dismissed