शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:54 IST

चोरीचे सत्र सुरुच

ठळक मुद्देसमता नगरात वृध्देच्या घरातून अडीच लाखाचा ऐवजआदर्श नगरात चोरटे रिकाम्या हाताने फिरले माघारी

जळगाव : शहरात आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये दोन ठिकाणी तर समता नगरात एक अशा तीन ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या झाल्याच्या घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. समता नगरात विमलबाई सोनार (वय ७०) यांच्या बंद घरात खिडकीची जाळी काढून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा अडीच लाखाच्यावर मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.सोन्याच्या बांगड्यावअंगठ्यालांबविल्यायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, समता नगरात विमलबाई सोनार या एकट्या राहतात. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी उचकवून विमलबाई यांच्या घरात प्रवेश केला. सुटकेसमध्ये ठेवलेले ७ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ७ ग्रॅमची अंगठी व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व ३५ हजार रुपये रोख काढून घेत चोरट्यांनी ही सुटकेस बाहेरच्या खोलीत फेकून दिली होती. विमलबाई सकाळी उठल्या असता त्यांना सुटकेस बाहेर व उघडी दिसली. घरातील अन्य वस्तूही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमलबाई यांचे नातेवाईक संजय सोनार यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, ज्ञानेश्वर कोळी, वासुदेव मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.आदर्श नगरात चोरटे रिकाम्या हाताने फिरले माघारीआदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये अनिल रत्नाकर शिंदे व कैलास रामदास पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.अनिल शिंदे हे पुणे येथे कैलास पाटील हे अष्टविनायक दर्शनाला गेलेले आहेत. दोन्ही कुटुंब परिवारासह बाहेरगावी असल्याने घरांना कुलूप होते. सकाळी संजय चव्हाण यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजा उघडा व कुलुप तुटलेले दिसल्याने त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. घरात रोकड किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चव्हाण यांनीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.चोरी व घरफोडीचे सत्र सुरुचशहरात चोरी व घरफोडीचे सत्र सुरुच आहे. त्याशिवाय दुचाकी व कार चोरीचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ११ ते २० आॅगस्ट या दहा दिवसात दहा घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतरही चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या. वाढत्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तीन घटना घडल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव