प्रेमसंबंधातून ‘त्या’ तरुणाचा खून

By Admin | Updated: November 16, 2015 20:15 IST2015-11-16T20:15:28+5:302015-11-16T20:15:28+5:30

ओळख पटली : तरुण मध्य प्रदेशातील मोहिदा येथील, दोन जेरबंद

The blood of the 'youth' in love | प्रेमसंबंधातून ‘त्या’ तरुणाचा खून

प्रेमसंबंधातून ‘त्या’ तरुणाचा खून

शिरपूर : तालुक्यातील जळोद गावाजवळील आंबाफाटा गावातील लेंडी नाल्याच्या कोरडय़ा पात्रात अनोळखी 24 वर्षीय तरुणावर चाकूने वार करून त्याचा मृतदेह जाळून टाकल्याप्रकरणी गावातीलच दोन संशयितांना जेरबंद करण्यात आले आह़े मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होत़े त्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आह़े

गेल्या रविवारी आंबाफाटा गावातील लेंडी नाल्याच्या पात्रातील खडकात अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला होता़ मृतदेहावर चाकूने 5-6 वार केल्याच्या खुणा होत्या़ त्या तरुणास ठार केल्यानंतर काही अंतरावर नेऊन त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता़ मयताच्या उजव्या हाताच्या मनगटावर गोंदलेले

शिरपूर पोलिसांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील सर्व पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून मयताचे वर्णन कळविले होते. जेणेकरून तो बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी असल्याचा संशय होता़ अखेर शिरपूर पोलिसांनी घटनेच्या तिस:याच दिवशी मृत अज्ञात इसम हा मोहिदा, ता़पानसेमल जि़बडवानी येथील दिलीप तारसिंग पावरा (24) असल्याचे निष्पन्न केल़े पथकाने मोहिदा येथे जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली़

मयताचे गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होत़े त्या महिलेच्या भावास प्रेमसंबंधाविषयी कुणकुण लागली होती़ त्यामुळे त्याने त्यास ठार मारण्याचा प्लॅन केला़ 8 रोजी दिलीप पावरा यास त्याची दुचाकी गाडी घेऊन संशयित आरोपी विनोद शोभाराम जाधव-पावरा (21) व प्रभात खुमसिंग भोसले (अल्पवयीन मुलगा) रा़मोहिदा, ता़पानसेमल हे तिघे जण जळोद गावी आले. त्या दोघांनी त्यास दारू पाजून खून केल्यानंतर जाळून टाकल़े

त्यानंतर मयत दिलीप पावरा याची दुचाकी गाडी घेऊन संशयितांनी ती नेवाली पोलीस ठाण्याच्या मागे लावून दिली़ दरम्यान 3 दिवसांपासून दिलीप हा घरी न आल्यामुळे पानसेमल पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली़ नेवाली पोलिसांनी बेवारस, विनानंबर गाडीचा मालक कोण? याचा शोध घेतला़

घटनेच्या तपासाकरिता सदर गाडी लावून आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला़ प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज़ेबी़ शिरसाठ व हवालदार रवींद्र मोराणीस व गुरुदत्त पानपाटील यांनी अवघ्या तिस:याच दिवशी खुनातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविल़े

दोन दिवसांच्या कसून चौकशीनंतर संशयित आरोपी विनोद शोभाराम जाधव (पावरा) (21) रा़मोहिदा ता़पानसेमल याने प्रभात खुमसिंग भोसले (अल्पवयीन मुलगा) या मित्राच्या मदतीने दिलीपचा खून केल्याची कबुली दिली़ पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आह़े

दिलआकारात डीअक्षर लिहिले होते तर डाव्या हातात स्टीलचे कडे घातले होत़े

 

Web Title: The blood of the 'youth' in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.