वडलीकरांनी जपले रक्ताचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:06+5:302021-07-10T04:13:06+5:30
जळगाव : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी वडली, ता. जळगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे ...

वडलीकरांनी जपले रक्ताचे नाते
जळगाव : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी वडली, ता. जळगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे जळगाव शहरात अशा दोन ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यात वडली येथे ४२ तर जेसीआयतर्फे २० दात्यांनी रक्तदान केले.
वडली येथे प्रतिसाद
वडली येथे ‘लोकमत’ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. सरपंच युवराज गायकवाड, संजय गांधी निराधार योजना समितीचे चेअरमन रमेश जगन्नाथ पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
पाथरीचे सरपंच शिरीष पाटील, माजी सरपंच नीलेश पाटील, संतोष नेटके, वडली विकासोचे चेअरमन सचिन पाटील, जळके विकासोचे माजी चेअरमन प्रवीण पाटील, जवखेडा येथील सरपंच रमेश पाटील, उपसरपंच धैर्यसिंग पाटील, वडलीचे उपसरपंच वसंत पाटील, सदस्य रामचंद्र पाटील, गजानन पाटील, मुनील पाटील, जगन्नाथ पाटील, अरुण पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय इंगळे व पोलीस पाटील दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, जनसंपर्क अधिकारी नीलेश पवार, अधिपरिचारक अरुण चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ अनिल पाटील, राजेश शिरसाठ, लक्ष्मीकांत त्रिपाठी, कक्ष सेवक पंकज चौधरी व तुषार निळे यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले. राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त तथा वडलीचे सुपुत्र रमेश पवार, तक्ते वादळात जीव बचावलेला वैभव माधवराव पाटील, नेटसेट उत्तीर्ण झालेले उपशिक्षक नारायण उंबरे व ग. स. चे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
२० दात्यांचे रक्तदान
जेसीआय जळगांव डायमंड सिटीतर्फे रेडक्रॉस रक्तपेढीत २० दात्यांनी रक्तदान केले. उदघाटनप्रसंगी झोन समन्वयक जीनल जैन, अध्यक्ष सुशील अगरवाल, सचिव सुवर्णा चौधरी, उपाध्यक्ष विशाल शर्मा, फिरोज शेख, कुलदीप बुवा, निशा पवार, ललित नेमाडे, कमलेश अग्रवाल, पियुष गुजराथी, उमाकांत पाटील, उमेश पाटील,संगीता वाघूळदे, शारदा धांडे, योगिता तळेले, प्रवीण महाले,ज्योती राणे, चेतन लोहार आदी उपस्थित होते. जेसीआयच्या महिला सदस्यांनी स्वतःहून हिमोग्लोबीनची पातळी तपासून घेत रक्तदान केले.