रोटरी वेस्टतर्फे रक्तदान, लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:07+5:302021-05-05T04:26:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्यावतीने रक्तदान शिबिर, लसीकरण मोहीम, नवीन ऑक्सिजन सिस्टीम्सचे लोकार्पण आणि ...

रोटरी वेस्टतर्फे रक्तदान, लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्यावतीने रक्तदान शिबिर, लसीकरण मोहीम, नवीन ऑक्सिजन सिस्टीम्सचे लोकार्पण आणि मातोश्री आनंदाश्रमात फळे व किराणा साहित्याचे वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी वेस्टतर्फे कोरोना काळातील चौथे रक्तदान शिबिर रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. त्यात ४० पेक्षा अधिक व्यक्तींनी रक्तदान करुन सहभाग घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण मोहीमही राबविण्यात आली.
रोटरी वेस्टतर्फे मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात ५० बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी रोटरी वेस्ट परिवारातील चेतना सतरा यांनी १ लाख ४५ हजार रुपयांचे योगदान दिले. रोटरी वेस्टने या रुग्णालयात यापूर्वी ७५ बेडससाठी ही सुविधा निर्माण करुन दिली आहे. मातोश्री आनंदाश्रमातील व्यक्तींसाठी १५ ते २० दिवस पुरतील या प्रमाणात फळे व किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.
या विविध कार्यक्रमात रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष गनी मेमन, डॉ. राजेश पाटील, विनोद बियाणी, अनंत भोळे, चंद्रकांत सतरा, अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, कुमार वाणी, सुनील सुखवाणी, अनुप असावा, प्रवीण जाधव, विवेक काबरा, सागर पाटील, दिग्विजय पाटील, सरिता खाचणे, देवेश कोठारी, विजय शामनानी, महेश सोनी, मुनीरा, तरवारी, कपील शहा, शंतनू अग्रवाल, धीरज फटांगळे, अमृत मित्तल आदी उपस्थित होते.