भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन संघातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:02+5:302021-04-22T04:17:02+5:30
जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती तर्फे २१ ते ...

भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन संघातर्फे रक्तदान शिबिर
जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती तर्फे २१ ते २५ एप्रिल या कालावधीत कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन पध्दतीने भगवान महावीर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रक्तदात्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व डॉ. अमृता मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दलिचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमर जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाल, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, हर्षाली पारख, विपीन चोरडीया आदी परिश्रम घेत आहेत.