नवीपेठेत आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:16 IST2021-04-27T04:16:57+5:302021-04-27T04:16:57+5:30

ढापा दुरुस्त करण्याची मागणी जळगाव : सम्राट नगरातील गटारीवरील ढापा तुटल्याने वाहनधारकांना व पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा ...

Blood donation camp in Navi Peth today | नवीपेठेत आज रक्तदान शिबिर

नवीपेठेत आज रक्तदान शिबिर

ढापा दुरुस्त करण्याची मागणी

जळगाव : सम्राट नगरातील गटारीवरील ढापा तुटल्याने वाहनधारकांना व पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने हा ढापा दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शिरसोली येथे वीज पुरवठा खंडित

जळगाव : शिरसोली येथे गेल्या काही दिवसांपासून दररोज अधून-मधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. तसेच विद्युत प्रवाह कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रविवारीही या परिसरात दुपारी बराच वेळ वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात उकड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Blood donation camp in Navi Peth today