नशिराबाद येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:15 IST2021-04-13T04:15:40+5:302021-04-13T04:15:40+5:30

महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कोरोना प्रादुर्भावाच्या शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग नुसार साजरी करण्यात आली. माळी समाजाचे अध्यक्ष हभप ...

Blood donation camp at Nasirabad | नशिराबाद येथे रक्तदान शिबिर

नशिराबाद येथे रक्तदान शिबिर

महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कोरोना प्रादुर्भावाच्या शासनाच्या

नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग नुसार साजरी करण्यात आली.

माळी समाजाचे अध्यक्ष हभप सुनील महाराज यांच्या हस्ते महात्मा फुले

यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच प्रा. विश्वनाथ महाजन यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या

प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक लक्षात घेता रुग्णांना रक्ताची गरज

भासत आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

करण्यात आले होते. यावेळी लोकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा

प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास सुनील महाजन, मोहन माळी, संदीप पाटील,

राकेश माळी, भूषण पाटील, रामू माळी, योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, राहुल

माळी, तुषार महाजन, भूषण माळी, संतोष माळी, मयूर महाजन, वासुदेव महाजन, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश महाजन, निखील पाटील, रवी माळी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास

उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Blood donation camp at Nasirabad