चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:20+5:302021-08-22T04:19:20+5:30

: समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कोरोना या काळातील रक्ताची गरज लक्षात घेता विद्यापीठ वर्धापन दिन आणि विद्यापीठ ...

Blood donation camp at the College of Social Work at Chopda | चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर

चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर

: समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कोरोना या काळातील रक्ताची गरज लक्षात घेता विद्यापीठ वर्धापन दिन आणि विद्यापीठ नामविस्तार यांचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले.

उद्घाटन भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा पूनमबेन गुजराथी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव अश्विनीबेन गुजराथी, प्राचार्य डॉ. आय.एम. सौंदांणकर, प्राचार्य राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक संतोष चौधरी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय एस.डी. चौधरी, अरुणभाई संदांशिव, उदय ब्रम्हे, प्रा. डॉ. व्ही.ए. रायपुरे, प्रा.डॉ. विष्णू गुंजाळ, प्रा. डॉ. अनंत देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. नारसिंग वळवी व प्रा. आशिष गुजराथी उपस्थित होते.

प्रस्ताविक शिबिर समन्वयक प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी केले.

प्रमाणपत्र वाटप

शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्राध्यापक अशिष गुजराथी (सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा. नारसिंग वळवी (विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा. डॉ. अनंत देशमुख (शिबिर समन्वयक) यांच्याहस्ते सहभागी १२ रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आभार प्रा. नारसिंग वळवी यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा .आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी, प्रा. डॉ. आनंद देशमुख, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे प्रशासक किरण गुजराथी, परेश चित्ते, किरण लोहार, वाय. एन. बारी, राहुल मिस्तरी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सोनू वैद्य यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp at the College of Social Work at Chopda