समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:17+5:302021-08-24T04:20:17+5:30
चोपडा : येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कोरोना काळातील रक्ताची गरज लक्षात घेता ...

समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर
चोपडा : येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कोरोना काळातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा पूनमबेन गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव अश्विनीबेन गुजराथी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. एम. सौंदाणकर, प्राचार्य राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक संतोष चौधरी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय एस. डी. चौधरी, अरुणभाई सदाशिव,उदय ब्रम्हे, प्रा. डॉ. व्ही. ए. रायपुरे, प्रा. प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ, प्रा. डॉ. अनंत देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. नारसिंग वळवी व प्रा. आशिष गुजराथी, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर समन्वयक प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी केले.
प्रमाणपत्र वाटप :
शिबिरात रक्तदान करणाऱ्या बारा रक्तदात्यांना प्राध्यापक आशिष गुजराथी (सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा. नारसिंग वळवी (विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा. डॉक्टर अनंत देशमुख (शिबिर समन्वयक )यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. नारसिंग वळवी (विद्यार्थी विकास विभाग )यांनी उद्घाटक प्रमुख अतिथी शिबिरास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विद्यार्थी विकास विभाग, समाजकार्य महाविद्यालयातर्फे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी, प्रा. डॉ. आनंद देशमुख(शिबिर सहाय्यक समन्वयक ), किरण गुजराथी (प्रशासक इंडियन रेड क्रॉस सोसायटी), परेश चित्ते, किरण लोहार, वाय. एन. बारी, शिरसाठ, राहुल मिस्तरी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सोनू वैद्य यांनी परिश्रम घेतले.