समर्पण अभिमानअंतर्गत चोपडा येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:31+5:302021-09-24T04:20:31+5:30
चोपडा : सेवा व समर्पण अभिमानांतर्गत चोपडा तालुका व शहर भाजप व भाजयुमोच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

समर्पण अभिमानअंतर्गत चोपडा येथे रक्तदान शिबिर
चोपडा : सेवा व समर्पण अभिमानांतर्गत चोपडा तालुका व शहर भाजप व भाजयुमोच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रथम भारत माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सर्वप्रथम तालुकाध्यक्ष पंकज पाटील व शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी रक्तदान केले.
शिबिराचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, ज्येेष्ठ नेते शांताराम पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील आदी मान्यवरांनी उद्घाटन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, चोपडा तालुका पालक महेश पाटील, जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रवींद्र मराठे, जिल्हा चिटणीस रंजना नेवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष ज्योत्स्ना चौधरी, चुंचाळे ग्रा.पं. सदस्य विमलबाई बाविस्कर, शहर उपाध्यक्ष वंदना पाटील, जिल्हा अनुसूचित जाती अध्यक्ष मगन बाविस्कर, रावेर भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, अमळनेर शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी शहराध्यक्ष योगिराज चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष ग्रामीण प्रकाश पाटील, शहर अध्यक्ष तुषार पाठक, पं.स. माजी उपसभापती भूषण भिल, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सरचिटणीस हनुमंतराव महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, बाजार समिती संचालक भरत पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष कांतिलाल पाटील, शहराध्यक्ष सुरेश चौधरी, किसान मोर्चा शहराध्यक्ष गोपाल पाटील, ओबीसी आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितीन राजपूत, वैद्यकीय आघाडी प्रदेश पदाधिकारी डाॅ. अडावदकर, वैद्यकीय आघाडीचे डाॅ. आशिष पाटील, प्रवीण चौधरी, भरत सोनगिरे, विशाल म्हाळके, माजी सरपंच हातेड, मनोज सनेर, मिलिंद पाटील, शेखर पाटील, दत्तात्रय पाटील खडगाव, जितेंद्र चौधरी, भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.