अंतुर्ली येथे शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:14+5:302021-09-16T04:22:14+5:30
उचंदा (ता. मुक्ताईनगर) : महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर्स सीड्स पेस्टिसाईड डीलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष व जि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ ...

अंतुर्ली येथे शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
उचंदा (ता. मुक्ताईनगर) : महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर्स सीड्स पेस्टिसाईड डीलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष व जि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ यांच्या वाढदिवसानिमत्त मित्रपरिवाराच्या वतीने अंतुर्ली येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३१ दात्यांनी रक्तदान केले.
गोदावरी फाउंडेशन रक्तपेढीचे डॉ. नितीन भारंबे, समन्वयक लक्ष्मण पाटील, इम्रान पठाण, ओवेस खान यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिरास भागवत पाटील, सुधीर तराळ, सुधाकर चोपडे, उपसभापती किशोर चौधरी, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विजय सोनार, शाहिदखान, पवनराजे पाटील, ताहेर खाँ, माजी सरपंच सुनील पाटील, सलीम इमानदार, दशरथ कांडेलकर, दिनेश पाटील, चेअरमन अंतुर्ली मर्चंट पतसंस्था व संचालक मंडळ, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र महाजन व संचालक, उपसरपंच गणेश तराळ, संदीप देशमुख, रामभाऊ तराळ शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेचे सर्व संचालक मंडळ, दूध उत्पादक संस्थेचे संचालक मंडळ, कैलास दुट्टे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.