महिला पर्यावरण मंचच्या शिबिरात २६ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:20+5:302021-07-18T04:13:20+5:30

जळगाव : महिला पर्यावरण सखी मंच, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, समाजवादी पार्टी जळगाव आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रेडक्रॉस ...

Blood donation of 26 donors in the camp of Mahila Paryavaran Manch | महिला पर्यावरण मंचच्या शिबिरात २६ दात्यांचे रक्तदान

महिला पर्यावरण मंचच्या शिबिरात २६ दात्यांचे रक्तदान

जळगाव : महिला पर्यावरण सखी मंच, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, समाजवादी पार्टी जळगाव आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २६ दात्यांनी रक्तदान केले. महिला पर्यावरण सखी मंच जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा पाटील यांनी सलग सातव्यांदा आपल्या कुटुंबासोबत रक्तदान करून रक्तदानाचा संदेश दिला आहे.

महापौर जयश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सखी मंच जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक ज्योती राणे यांनी केले. उज्ज्वला शिंदे, ॲड. वैशाली बोरसे, ॲड. सीमा जाधव, सुनीता चौधरी, वैशाली बाविस्कर, लता मोतीरामानी, ज्योती राणे, जावेद खाटीक, भूषण शिंपी, आश्विनी जगताप, मनीषा पाटील, साईनाथ पाटील, किशोर पाटील, प्रसाद पाटील, प्रसाद पांगळे, वसीम शहा, शोएब शहा, लता मोतीरामानी, अमेय कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, शेख नासिर शेख रशीद, शेख निसार शेख हुसेन, शेख शकील शेख सलीम, विशाल बोरसे, अमन पांडे, मोहम्मद आसिफ मकसूद शेख, अहमद सय्यद शफिक, ॲड. देवेंद्र जाधव, जितेंद्र हेमलानी, अब्दुल्ला खान बशीर खान, शाहरुख सलीम, शेख मोहिनुद्दीन इक्बाल यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 26 donors in the camp of Mahila Paryavaran Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.