राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 20:25 IST2019-11-28T20:25:37+5:302019-11-28T20:25:43+5:30
एरंडोल जवळील घटना

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार
एरंडोल - साड्यांचे गठ्ठे भरलेला आयशर ट्रक बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पेटल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पंपळकोठा दरम्यान घडली. सदर अपघातग्रस्त ट्रकचालक हा यानंतर मालकाकडे सुरत येथे गेल्याचे समजते. याप्रकरणी एरंडोल पो. स्टे. ला गुरुवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.
जीजे १६/९९०२ या क्रमांकाचा आयशर ट्रक साड्यांचे गठ्ठे भरून सुरत येथून नागपूर जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोल पासून जळगाव कडे सुमारे ७ ते ८ कि.मी. अंतरावर एका ढाब्याजवळ हा ट्रक अचानक पेटला. हा थरार पाहून हायवेवरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. हा ट्रक पेटल्यामागचे कारण समजू शकले नाही. हा ट्रक पेटला की पेटविला याबाबत उलट सुलट चर्चा आहे. थंडीच्या दिवसात हे वाहन पेटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.