लग्नाच्या स्वागत समारंभात केले ब्लेडने वार

By Admin | Updated: May 19, 2014 02:00 IST2014-05-19T02:00:32+5:302014-05-19T02:00:32+5:30

मित्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभात जेवण वाढण्याच्या कारणावरून दोघांनी एकाच्या मानेवर ब्लेडने वार के

Blade strikes at the wedding reception | लग्नाच्या स्वागत समारंभात केले ब्लेडने वार

लग्नाच्या स्वागत समारंभात केले ब्लेडने वार

जळगाव : मित्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभात जेवण वाढण्याच्या कारणावरून दोघांनी एकाच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची घटना शनिपेठमधील दत्त मंदिराजवळ रविवारी सायंकाळी ५़४५ वाजेच्या दरम्यान घडली़ पंकज अशोक वाणी (२७), रा़शनिपेठ हा त्याचा मित्र मनोज माळी याच्या लग्नाच्या स्वागत समारंभात विसनजीनगरमध्ये गेला होता़ या वेळी जेवण वाढण्याच्या कारणावरून त्याचा प्रवीण सुरेश माळी व प्रशांत सुरेश माळी (दोघे रा़शनिपेठ) यांच्यासोबत वाद झाला़ हे भांडण वाढतच गेले़ या दरम्यान प्रवीण याने पळत जावून शेजारील हेअर कटींग सलूनमधून वस्तारा व ब्लेड आणले़ वस्तार्‍यात ब्लेड टाकण्याचा प्रयत्न केला़ परंतु प्रयत्न फसला़ त्यामुळे त्याने ब्लेडने वार करून दोघांनी मारहाण केली़ या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

Web Title: Blade strikes at the wedding reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.