शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

कारागृहात कैद्यावर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:34 AM

भेटीवरुन वाद

ठळक मुद्देदोन कैद्यांच्या पत्नीतही हाणामारी

जळगाव : परिवारातील सदस्यांच्या भेटीवरुन कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी होऊन एका कैद्याने दुसऱ्याच्या छातीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. इसा शेख हमीद (रा.तांबापुरा, जळगाव) असे जखमीचे नाव आहे. कारागृह प्रशासनाने मात्र हल्ल्याचा इन्कार केला आहे.गोळीबाराच्या प्रकरणात सतीश गायकवाड हा गेल्या तीन ते चार वर्षापासून कारागृहात आहे तर इसा शेख हा देखील हाणामारीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. शनिवारी दोघांच्या पत्नी व नातेवाईक त्यांना भेटायला आले होते.सतीश गायकवाड हा इंटरकॉम सेवेच्या दूरध्वनीवरुन पत्नीशी बोलत असताना, तेथेच इसा याचीही पत्नी होती. तेथे दोघं कैद्यांच्या पत्नीत वाद झाला.त्यानंतर इसा व गायकवाड यांच्यात खिडकीजवळच वाद झाला. यात गायकवाड याने इसा याच्यावर ब्लेडने हल्ला केला. त्यात पोटाजवळ रक्तस्त्राव झाल्याचा दावा इसाची पत्नी दीपाली व भाऊ अल्ताफ याने केला.बाहेरुन आणली औषधीइसा याच्यावर हल्ला झाल्यानंतर उपचारासाठी कारागृहात औषधी नव्हती, त्यामुळे आपण बाहेरुन औषधी आणून दिल्याची माहिती इसाचा भाऊ अल्ताफ याने पत्रकारांना दिली. यात तो नेमका किती जखमी झाला आहे, ते सांगितले जात नाही तसेच कुटुंबाला भेटू दिले जात नसल्याचे अल्ताफ याने सांगितले. बाहेर गायकवाड याच्या पत्नीनेही मारहाण केली व तुझ्या नवºयाला माझा नवरा कारागृहात इंगा दाखवेल अशीही धमकी दिल्याचा आरोप दीपाला हमीद यांनी केला.गायकवाड याने यापूर्वीही घातला होता वादगायकवाड याने यापूर्वीही कारागृहात वाद घातला होता, त्यामुळे त्याला तत्कालिन प्रभारी अधीक्षक सुनील कुवर यांनी नाशिकला पाठविले होते. आता तो पुन्हा परत आला. त्याशिवाय कारागृहाचे तत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव व एका कर्मचाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळाही लावला होता. हा सापळा यशस्वी झाला होता.दोन कैद्यांच्या पत्नीचा बाहेर वाद झाला. कारागृहात दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. ब्लेडने हल्ला केल्याची अफवा आहे. तशी कोणतीच घटना घडली नाही. आधीच कारागृहात क्षमतेपक्षा दुपटीने कैदी आहेत. -अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक, कारागृहकारागृहात भाऊ इसा याच्यावर सतीश गायकवाड याने ब्लेडने हल्ला केला. त्याच्यावर उपचारासाठी मी स्वत:च बाहेरुन औषधी आणून दिली. त्यानंतर कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी भावाला भेटू देत नाही. पत्रकारांना माहिती सांगू नका, नाही तर तुमची भेट होवू देणार नाही असेही धमकावले जात आहे. -अल्ताफ शेख हमीद, जखमीचा भाऊ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी