शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

 तोंडावर काळी शाई फे कून कॉँग्रेस सरचिटणीसाला रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:58 IST

लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव मगन पाटील (रा.चोपडा) यांच्या तोंडावर काळी शाई फेकून महिला कॉँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्यासह दहा ते बारा जणांनी स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता कॉँग्रेस भवनात घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेस भवनातील घटना  माजी शहराध्यक्षा अरुणा पाटीलसह १२ जणांविरुध्द गुन्हा

जळगाव: लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव मगन पाटील (रा.चोपडा) यांच्या तोंडावर काळी शाई फेकून महिला कॉँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्यासह दहा ते बारा जणांनी स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता कॉँग्रेस भवनात घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या पाश्वभूमीवर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे व तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष असे काँग्रेस भवनात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता जमले होते. त्यावेळी अजबराव पाटील हे आपल्या दालनात बसले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अरुणा पाटील व त्यांचे सोबत १० ते १२ जण अचानक अजबराव पाटील यांच्या दालनात घुसले व त्यांनी पाटील यांच्या अंगावर तसेच तोंडावर काळी शाई फेकली. तसेच सोबतच्या लोकांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन जणांनी स्टिलच्या रॉडने तसेच लाकडी दांड्याने खांद्यावर तसेच डाव्या हाताला मारहाण करत अजबराव पाटील यांना ओढत दालनाच्या बाहेर आणले. हा प्रकार पाहिल्यानंतर दालनातील नदीन काझी, सुभाष पाटील, मनोज चौधरी, राजेंद्र पाटील यांनी पाटील यांना सोडविले. याप्रकरणी अजबराव पाटील यांच्या यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अरुणा पाटील यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कलम १४३,१४७,१४९,३२३,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पदावरुन काढल्याच्या रागातून केले कृत्यअजबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अरुणा पाटील या सतत पक्षाविरुध्द कारवाया करीत असल्याने ३ ते ४ दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी त्यांना शहराध्यक्ष पदावरुन काढले.त्या रागातून अरुणा पाटील हे काही जणांना घेऊन आले व शाई फेकण्यासह मारहाण केल्याचे अजबराव पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव