भाजपचा अभूतपूर्व आणि निर्भेळ असाच विजय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:10 PM2019-05-26T12:10:34+5:302019-05-26T12:10:46+5:30

मागील निवडणुकीपेक्षा ७८ ते ८३ जास्त जागा

BJP's unprecedented and equitable victory | भाजपचा अभूतपूर्व आणि निर्भेळ असाच विजय...

भाजपचा अभूतपूर्व आणि निर्भेळ असाच विजय...

Next

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवून मागील निवडणुकीपेक्षा ७८ ते ८३ जास्त जागा मिळवल्या आहेत. हा विजय अभूतपूर्व, निर्भेळ आहे. तो मोदी-शहा जोडीचा आहे. त्यांच्या नियोजनाचा, आर्थिक ताकदीचा व संघटन शक्तीचा आहे. या यशासाठी मोदीजी, अमित शाह व भाजपचे अभिनंदन केले पाहिजे. भाजपला केरळ, तामिळनाडूमध्ये खाते देखील उघडता आले नाही तर कर्नाटकात त्यांनी जम बसविला आहे. पूर्व-ईशान्य भारतात, बंगाल-ओरिसा येथे त्यांनी नव्याने आधार शोधले आहेत. उत्तर प्रदेश-बिहार-मध्य प्रदेश-राजस्थान-गुजराथ-महाराष्ट्र येथे त्यांनी विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. आता ओबीसी जाती आधारे किंवा राखीव जाती आंदोलनाच्या आधारे होणारे राजकारण संपणार काय असा प्रश्न निर्माण केला आहे.
यशाची कारणे
भाजपने कमीपणा घेवून का होईना शिवसेना, जेडीयू यांच्याशी युती केली. तसे कॉंग्रेसला जमले नाही. त्यांचा अहंकार आडवा आला. कॉंग्रेसने जरा आत्मपरीक्षण केले पाहीजे. विरोधी पक्षांची एकजूट निट होवू शकली नाही.
मोदी प्रतिमा निर्माण
जनमानसात मोदींची प्रतिमा भ्रष्टाचार न करणारा, कोणासाठी भ्रष्टाचार करील, ह्याला कुटुंब नाही, अशी राहिली. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर विश्वास ठेवण्यासाठी जनतेला पुरेसा त्रयस्थ पुरावा लागतो. तो टुजी प्रकरणात सीएजीच्या आॅडीटने दिला व वृत्तपत्रीय बातम्या, प्रचार व अण्णा हजारेंच्या आंदोलनाने जनतेची भ्रष्टाचार झाल्याची खात्री पटली होती. १९८७ मध्ये संरक्षण मंत्री व्ही. पी. सिंग यांनीच बंड केल्याने जनतेची भ्रष्टाचार झाल्याची खात्री पटली होती. यावेळी राफेल प्रकरण अगदी निवडणुकीच्या तोंडावर आले. जनतेची पूर्ण खात्री पटली नव्हती. जनतेला राफेल समजण्या आधीच व त्यांची खात्री पाटण्याआधीच निवडणूक झाली. आता तरी राहुल गांधींनी पुरावे गोळा करून हा मुद्दा लावून धरला तर पुढील निवडणुकीत त्यांना फायदा मिळू शकतो. निवडणुकीत खंबीरपणे उभे आहात, जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी लढत आहात याचा विश्वास जनतेला द्यावा लागतो. पूर्वी हरलेल्या १६० जागांवर अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केले. बारामतीत सुप्रियाला हरविणार असे वातावरण केले. अमेठीत राहुल गांधींना हरविणार असे वातावरण निर्माण केले. विरोधकांना मोदींच्या विरोधात वाराणसीत सक्षम उमेदवार देता आला नाही. २०१४ ला स्वत: अरविंद केजरीवाल मोदी यांच्या विरोधात उभे होते याला धाडस लागते. ते जनतेला भावते. लढा खरा आहे मनापासून आहे असा संदेश जातो. स्वत: मायावती-अखिलेश- प्रियांका यांनी मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढण्याचे सामर्थ्य दाखवायला हवे होते. येथे विरोधक अपयशी ठरलेत.
प्रतिमा निर्मितीत सहभाग चॅनेल्सने ५ वर्षात मोदींची प्रतिमा जनमानसावर ठसविण्यात यश मिळविले आहे. सोशल मीडियामध्ये अनेक खोट्यानाट्या बाबी खास करून इतिहासातील पसरविण्यात भाजपाला यश मिळाले. कॉंग्रेसच्या मंडळींचा अभ्यास नाही, ती त्यांची वृत्ती नाही. सोशल मीडियामधील प्रचाराला कॉंग्रेसचे कार्यकर्ते उत्तर देवू शकले नाहीत. केवळ मोदी विरोध नको, सकारात्मकता हवी. राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली. योग्य भूमिका घेतल्या पण त्यांना सातत्य दाखवावे लागेल. विरोधकांचे राजकारण व सोशल मिडीयावरील विरोधकांचे राजकारण हे मोदी विरोधाचे होते. ते व्देषमूलक झाले. विरोधकांनी देशाच्या विकासाचा पर्यायी कार्यक्रम मांडावा. तो कार्यक्रम जनतेत न्यावा. तुम्ही मोदींना चांगला पर्याय देवू शकता असा विश्वास जनतेत निर्माण झाला पाहीजे.
राफेल प्रकरण अगदी निवडणुकीच्या तोंडावर आले. जनतेची पूर्ण खात्री पटली नव्हती. जनतेला राफेल समजण्या आधीच व त्यांची खात्री पाटण्याआधीच निवडणूक झाली. आता तरी राहुल गांधींनी पुरावे गोळा करून हा मुद्दा लावून धरला तर पुढील निवडणुकीत त्यांना फायदा मिळू शकतो.

- शेखर सोनाळकर, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: BJP's unprecedented and equitable victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव