शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 14:11 IST

देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, येत्या ५ सप्टेंबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपला आरक्षण नको आहे, पण आरक्षणाच्या मुद्यावर मात्र राजकारण करायचे आहे. आता केंद्राने पाच दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, असेल हिंमत तर याच अधिवेशनात मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी भाजपला दिले आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार हा गृहमंत्रालयाच्याच आदेशाने झालेला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याला सर्वस्वी जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

येत्या ५ सप्टेबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व सरकारवर टिका केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, पालघर जिल्ह्यातील विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. राज्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. शेती मुख्य व्यवसाय असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा आम्ही दुष्काळ जाहिर करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

जालन्यात आधी पोलिसांकडून लाठीचार्जजालन्यात आधी दगडफेक झाली व नंतर लाठी चार्ज झाला असे सरकार सांगत आहे. आपण आज पहाटे २.३० वाजता जालन्यात जाऊन जे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसले होते, त्यांच्या कुटूंबियांची आपण भेट घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेतली. येत्या ८ सप्टेबर रोजी जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघडू शकतो म्हणून मुंबईत महायुतीच्या बैठक सुरु असताना पोलिसांना निरोप आला व त्यांनी  आंदोलनकर्त्यांना उचलले. त्यातून वाद झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली, त्यानंतर दगडफेक झाली. यात छऱ्याचा वापर झालेला आहे. अनेकांच्या छातीत, पोटात व शरीरात छरे आढळून आले. हा कोणता प्रकार आहे. याआधी असा प्रकार कधीच घडलेला नाही. जालन्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसताना अमानुषपणे लाठीचार्ज होतो. गृहमंत्रालयाच्या आदेशानेच पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या घटनेचा आपण निषेध करीत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRohit Pawarरोहित पवार