जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांचा २४९२ मतांनी पराभव केला.स्थापनेनंतर पहिल्यांदाच झालेल्या शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी, शिवसेना, मनसे व काही अपक्षांनी निवडणूक लढविली. मतमोजणीनंतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे.सोमवारी सकाळी १० वाजेपासून माहेश्वरी मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रभाग १ मधील भाजपा उमेदवार रंजना धुमाळ यांनी विजयी सलामी दिली. यानंतर भाजपाची विजयाकडे घौडदौड कायम सुरु राहिली.सुरुवातीपासून नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार विजया खलसे व राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांच्यात काट्याची लढत सुरु होती. पहिल्या फेरीत क्षितीजा गरूड या २५० मतांनी पुढे होत्या. त्यानंतर चौथ्या फेरी अखेर मात्र खलसे यांनी मुसंडी मारत ९८१ मतांनी आघाडी घेतली. या तुलनेत नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या मनिषा बारी व मनसेच्या सरिता चौधरी या पिछाडीवर राहिल्या. अखेर भाजपाच्या विजया खलसे यांना ७७४५ मते मिळवून विजयी झाल्या.
शेंदुर्णीत भाजपाची ‘महाजनकी’ सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:12 IST
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली आहे. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी राष्ट्रवादीच्या क्षितीजा गरूड यांचा २४९२ मतांनी पराभव केला.
शेंदुर्णीत भाजपाची ‘महाजनकी’ सरस
ठळक मुद्देभाजपाला सर्वाधिक १३ जागांवर विजयराष्ट्रवादीला केवळ तीन जागाशिवसेना व मनसेची दाणादाण