शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा इनकमिंग कोटा फुल्ल, इतर पक्षांतील लोकांना घेण्याचा विचार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 18:40 IST

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

मोहन सारस्वत/ जामनेर (जि. जळगाव) : भाजपचा इनकमिंग कोटा आता संपला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना भाजपत घेण्याबाबत विचार नाही, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. एकलव्य शाळेच्या पटांगणावर रविवारी रोजगार मेळावा झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.

कॉंग्रेसमधूनही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते भाजपमध्ये आल्याने त्यांना उपमुख्यमंत्री करता आले. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री येणार असल्याचे तुम्ही सांगतात, मात्र त्यांना घेऊन दोन मुख्यमंत्री कसे करणार? असा मिश्कील सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी विदर्भाचा दौरा केला नाही. विदर्भाप्रती असलेले त्यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विधान परिषदेच्या सभापतिपदी भाजपचे राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे नाव समोर आले आहे, याबाबत ते म्हणाले की, आता आमचे सरकार तीन इंजिनचे असल्याने सर्वानुमते निर्णय घेऊ.

सध्या खुर्च्यांची पळवा-पळवी सुरू असल्याने खुर्ची सांभाळा, असा गमतीशीर टोलाही त्यांनी लगावला. जर्मनीत नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी जर्मनीत गेले पाहिजे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी जर्मन भाषा शिकविण्याबाबतदेखील प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन