भाजपचे अभिषेक पाटील यांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST2020-12-08T04:13:54+5:302020-12-08T04:13:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी नेहमीप्रमाणे आरोप करून खमंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ...

भाजपचे अभिषेक पाटील यांना आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी नेहमीप्रमाणे आरोप करून खमंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी विश्रामगृहाच्या गैरवापर केला हा आरोप धादांत खोटा आहे त्याबद्दल त्यांनी आरोप सिध्द करावा किंवा जाहीर माफी मागावी असे आव्हान भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी अभिषेक पाटील यांना दिला आहे.
अभिषेक पाटील यांनी आरोप केल्यानंतर भाजपने देखील पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. गैरवापर म्हणजे विनामूल्य विनापरवानगी राहणे असे कोणतेही कृत्य आमदार भोळे यांनी केलेले नाही. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आमदार भोळे यांनी सहा हजार रुपये चा चेक शासकीय खात्यात भरलेला आहे याचाच अर्थ असा की शासकीय नियमाप्रमाणे शुल्क भरून आमदार निवास करत आहे यात गैर वापर कुठे आहे हे सिद्ध करा अन्यथा आपण जाहीर माफी मागा असे आव्हान भाजपकडून पाटील यांना देण्यात आले आहे.