यावल : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना तळागाळांतील सामान्य माणसांपर्यंत केंद्र व बुथप्रमुखांनी पोहोचवा. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका आपण सहज जिंकू, असे आवाहन माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी शुक्रवारी येथे केले.
भाजपच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
येथील धनश्री चित्रमंदिरात हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, संघटनमंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मसाका अध्यक्ष शरद महाजन, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, जि. प. सदस्य सविता भालेराव, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पं. स. गटनेता दीपक पाटील, लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, प्रदेश सदस्य मीना तडवी, नरेंद्र नारखेडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.