भाजपचा घंटानाद निव्वळ देखावा-कारवाईची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:09 IST2020-08-31T15:08:10+5:302020-08-31T15:09:15+5:30
भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

भाजपचा घंटानाद निव्वळ देखावा-कारवाईची शिवसेनेची मागणी
भुसावळ : भाजपतर्फे कोरोना काळामध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद असताना फक्त देखावा म्हणून घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र त्यांचे राजकारणातील पितळ उघडे पडले असून, भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
राजकीय स्टंट बाजी म्हणून भाजपतर्फे घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. हे करत असताना मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताई यांच्या पवित्र मंदिरात आंदोलन करीत असताना खासदार रक्षा खडसे, राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई मंदिरात चप्पल घातल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवसेनेतर्फे भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाºयांना देण्यात आले आहे.
निवेदनावर शिवसेनेचे विलास मुळे, राहुल सोनटक्के, अन्सार शहा, बबलू बºहाटे, योगेश बागुल, धनराज ठाकूर आदींच्या सह्या आहेत.