ओबीसी आरक्षणासाठी वरणगावात भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:26+5:302021-09-17T04:20:26+5:30
वरणगाव, ता. भुसावळ : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द करून महाविकास आघाडीने एकप्रकारे लोकशाहीचा खून केल्याच्या ...

ओबीसी आरक्षणासाठी वरणगावात भाजपचे आंदोलन
वरणगाव, ता. भुसावळ : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द करून महाविकास आघाडीने एकप्रकारे लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ व स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी वरणगाव मंडल कार्यालयावर भाजपच्या वतीने मोर्चा काढून महाविकास आघाडी विरुद्ध आंदोलन करण्यात आले.
ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अन्यथा भाजपतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामध्ये माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख अल्लाउद्दीन, मिलिंद भैसे, संतोष शेळके, डॉ. सादिक अरुण बावणे, विवेक शिवरामे, साबीर कुरेशी, नटराज चौधरी, शेख फहिम, बाळू कोळी, रमेश पालवे, ज्ञानेश्वर घाटोळे, इरफान पिंजारी, पप्पू ठाकरे, आकाश निमकर, महिलाध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, कृष्णा माळी, डी. के. खाटीक, अन्सारी शेख सिराज, संगीता माळी, मंदा थटार, गंगूबाई माळी, जयश्री अवतारे, नीता तायडे, कस्तुरा इंगळे, राहुल जंजाळे, गोलू वंजारी, अशपाक खाटीक, नथू कोळी, के. के. अंभोरे, गंभीर माळी, कमलाकर मराठे, विशाल कुंभार, प्रताप दिव्यवीर, दीपक चौधरी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तलाठी कल्पना गोरले यांनी निवेदन स्वीकारले.