भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:06+5:302020-12-05T04:25:06+5:30

बोदवड : मुक्ताईनगर, बोदवड मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग शिरसाळा येथे पार पडले. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, माजी जि.प. ...

BJP worker training | भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण

भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण

बोदवड : मुक्ताईनगर, बोदवड मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग शिरसाळा येथे पार पडले. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, अनंतराव कुलकर्णी, डी. एस. चव्हाण, राजेंद्र नन्नवरे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, शांताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार धांडे, प्रभाकर महाजन, सुपडू जंजाळ, डॉ. अतुल सरोदे यांनी पाच सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. डॉ. किशोर कोल्हे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. प्रास्ताविक प्रा. महेंद्र सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. दिलीप सोनवणे यांनी केले. आभार डॉ. रेखा पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला ८९ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागामार्फत करण्यात आले होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची तहसीलदार यांनी घेतली भेट

हरताळा,ता. मुक्ताईनगर: येथील ज्ञानेश्वर आत्माराम बानाईत या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची तहसीलदार श्वेता संचेती यांनी भेट घेतली.यावेळी तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव देशमुख, तलाठी सोमनाथ बोराटकर, प्रदिप काळे,कृषी सहायक टी. इ. कारंडे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दिव्यांगांची मागणी

बोदवड : तालुक्यातील दिव्यांग बांधवांकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यात राष्ट्रीय दिव्यांग पार्टीकडून दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ लागू करण्याची मागणी केली. धनराज गायकवाड , किशोर बडगुजर, सचिन उगले, श्यामलाल लुंढ, भगवान सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Web Title: BJP worker training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.