भाजप महिला पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:29 IST2021-02-28T04:29:52+5:302021-02-28T04:29:52+5:30
पुण्यात पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असून राजीनामा व ...

भाजप महिला पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका
पुण्यात पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असून राजीनामा व गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी चौकात महामार्गावर भाजप महिला आघाडीतर्फे चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ व रामानंद नगर पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलीस अधीकच दक्ष झाले होते. पोलिसांना न जुमानताच महिलांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात वरील पाच महिलांविरुध्द मुंबई पोलीस कायदा ६८, ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करुन लगेच सुटका करण्यात आली.