शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

भाजप हा आत्मघातकी पक्ष - संजय सावंत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:45 IST

सुरेशदादांच्या मोठेपणामुळे मनसेचा महापौर होवू शकतो तर शिवसेनेचा का नाही?

ठळक मुद्दे‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्या गाफील न राहता काम करा

जळगाव : भाजपा हा आत्मघातकी पक्ष असून, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले होते. सुरेशदादा जैन यांनी आपल्या मनाचा मोठेपणा व शहराच्या विकासाच्या दृष्टीने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने आपले मुळ गुणसुत्र दाखवत राजकारण केले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वबळावर मनपा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले.शहरातील खान्देश कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय सावंत हे बोलत होते. यावेळी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर रमेशदादा जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील तसेच शिवसेनेचे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य देखील उपस्थित होते.‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्याविरोधी पक्षाकडून साम, दाम, दंडचा वापर होवून,पैशांचा पाऊस पाडला जाईल. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना कोणत्याही मतदाराला बळी पडू देवू नका. ‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे विरोधी पक्षाला दाखवून द्या. बाळासाहेब ठाकरेयांच्या शिवसैनिकांनी निश्चिय केलातर काय करू शकतात हे त्यांना दाखवून द्या, ‘एक भुल कमल का फुल’ हे जळगावकरांना पटवून द्या असेही सावंत म्हणाले.आता लढायची वेळ आहे, गाफील न राहता काम करा- आर.ओ. पाटीलमाजी आमदार आर.ओ.तात्या पाटील म्हणाले की, भाजपाची वृत्ती कशी आहे हे ओळखून या निवडणुकीत जोमानेकामकरावे. आता लढायची वेळ असून गाफील न राहता काम करा. माजी महापौर रमेशदादा जैन यांनी देखील निवडणुकीच्या आढावाबाबत माहिती देवून शिवसेनेचाच महापौर होणार असल्याची हमी यावेळी दिली. माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील यावेळी पदाधिकाºयांना मार्गदर्शन केले.अस्तित्वाची लढाई समजणाºयांनाजनता अस्तित्व दाखविणारमनपा निवडणूक ज्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई समजली आहे. त्यांना जळगावची जनता निवडणुकीनंतर आपले अस्तित्व दाखवून देईल असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिला.पत्रपरिषदेस सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, कि शोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, माजी महापौर रमेशदादा जैन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक जितेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते.पत्रपरिषदेत सावंत म्हणाले की, निवडणुकीआधी युतीबाबत सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेची तयारी पूर्ण होती. त्यानुसार आम्ही मैदानात उतरले असून जळगावकर शिवसेनेला साथ देतील.मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविणारचसंजय सावंत बैठकीत म्हणाले की, सुरेशदादा जैन यांनी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण घराघरात जायला हवे यासाठी यंदा खान्देश विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक न लढविता शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेनेवर टाकलेला हा विश्वास सर्व शिवसैनिकांनी सार्थ ठरवायचा असून, ३ आॅगस्टला मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवून जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर बसविण्यासाठी मनापासून व पूर्ण ताकदीने प्रयत्न करावे, असे आवाहनही संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम करावे !खान्देश विकास आघाडीचे मनपात वर्चस्व आहे.मनसेचे केवळ ११ नगरसेवक असताना सर्वांना सोबत घेत शहराच्या विकासासाठी सुरेशदादा जैन यांनी मनसेचा महापौर मनपात बसविला. सुरेशदादा यांनी शिवसेनेचाच महापौर बनविण्याचा आता चंग मनाशी बांधला असून, आता रात्र-दिवस विसरुन पक्षासाठी वेळ काढून प्रत्येक प्रभागात शिवसेनेसाठी काम करा असे आवाहन संजय सावंत यांनी केले.निष्ठावंतांना शिवसेना कधीही डावलत नाहीकोणत्याही निष्ठावंत उमेदवाराला डावलले नसून, शिवसेना निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष असल्याचेही सावंत म्हणाले. तसेच खान्देश विकास आघाडी ही देखील शिवसेनेची होती. सुरेशदादा जैन यांनी शहराचा विकासालाच महत्व देवून या आघाडीमध्ये इतर विचारांच्या उमेदवारांना घेतले होते. त्यामुळे खाविआ किंवा शिवसेना वेगवेगळे असे नव्हतेच. पक्षाचे चिन्ह आता घरोघरी जावे यासाठीच यंदा धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही सावंत यांनी पत्रपरिषदेत दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव