शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मनपा निवडणुकीत भाजपाने खर्च केले ६० कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:52 IST

अजित पवार यांचा आरोप

ठळक मुद्देगिरीश महाजनांनी बारामतीत येऊन दाखवावेच

जळगाव : मनपा निवडणुकीवर भाजपाने ६० कोटी रूपये खर्च केले असा आरोप करीत भाजपाने एवढा पैसा कुठून आणला? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी केला. तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकत घेण्याची भाषा बंद करावी, असा इशाराही दिला. येथील रिंगरोडवरील मणियार ग्राउंडवर १८ रोजी सायंकाळी आयोजित राष्टÑवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्तच्या जाहीर सभेत ते बोलत होते. तसेच बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजनांनी बारामतीत त्यांनी येऊनच दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.मुंडे, जयंत पाटलांनीही साधला निशाणाविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावात झालेल्या नागरी सत्काराची आठवण करून देत अशा नागरी सत्कारातून मिळालेल्या देणगीतून भाजपाचा कारभार चालत होता, असे सांगत आज जळगाव मनपा निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपाने ६० कोटी रूपये खर्च केले. त्यापाठोपाठ धुळे, नगरलाही ६०-६० कोटी खर्च केले. एवढी ऐपत कशी झाली? चार वर्षात असे काय झाले? असा सवाल केला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात तोच उल्लेख करीत गिरीश महाजनांवर हल्ला चढविला. जयंत पाटील म्हणाले की, मुंडे यांच्या भाषणातून समजले असेल की जिल्ह्यातील एक मंत्री सुपारी घेतात, असा त्यांचा नावलौकिक झाला आहे. मात्र कसली सुपारी घेता? तर मनपा निवडणुकीत पैसे खर्च करून सगळे विकत घेण्याची. जळगाव, धुळे, नगरची सुपारी घेतली. नाशिकलाही हाच प्रकार केला. राज्यातील वेगवेगळ्या शहरात यांनाच का पाठवता? हे लक्षात आले असेलच, असा टोला महाजन यांचे नाव न घेता लगावला.मंत्री झालात म्हणून शिंग आली का?धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्या भाषणातील हाच मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित करीत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मनपा निवडणुक जिंकल्यानंतर आता वरिष्ठांनी सांगितले तर बारामतीला जातो व जिंकून दाखवितो, असे अशी वल्गना महाजन यांनी केली. त्यांना सांगतो, बारामतीला येऊनच दाखवा. त्यांचेस्वागत करू मात्र विकत घेण्याची भाषा केली तर खपवून घेणार नाही. ५० वर्ष मला व चुलत्यांना निवडून देताहेत. मंत्री झालात म्हणून शिंग आली की फार अक्कल आली? यशाने हरखून जायचे नसते व पराभवाने खचून जायचे नसते. जरा दमानेच. उगीच आव आणत मी, मीपणा करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.सत्तेची नशा चढली का?धानवड येथे बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे २५० शेतकरी उपोषणास बसले आहेत. सरकारनेच घोषणा केली आणि देत मात्र नाहीत. म्हणून उपोषणाला बसले. हक्कच आहे त्यांचा. मात्र जिल्ह्यातले दुसरे मंत्री गुलाबराव पाटील तेथे गेले. दमदाटी करीत उपोषण मागे घ्यायला सांगितले. कुस्ती खेळायला बोलावल का? असे विचारत समोरासमोर खेळा, राजकारण खेळू नका, असे धमकावले. दुसरीकडे दानवे शेतकºयांना साले म्हणतात. एवढी कसली मस्ती? सत्तेची नशा चढली का? असा सवाल केला.बहिणाबार्इंचे स्मारक रखडलेअसोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी काँग्रेस-राष्टÑवादीचे सरकार असताना अडीच कोटी दिले. ते खर्च झाले. मात्र आता काम निधीअभावी बंद आहे. स्मारकाची उंची १८ मीटरवरून ८ मीटर करण्यात आली. हे काम निदान पूर्ण व्हावे, ही अपेक्षा आहे, असा टोला लगावला.सरकार जाण्यापूर्वी मनपाला १०० कोटी देऊन टाकामाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मनपात भाजपाने विजय मिळविला तर १०० कोटी देणार असल्याचे जाहीर केले होते. गिरीश महाजन आमचे मित्र आहेत. पक्ष बाजूला ठेवून विनंती करतो, की कृपा करून मंत्रीमंडळ घरी जाण्यापूर्वी १०० कोटी मनपाला देऊन टाका. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक असलेल्या मंत्र्याच्या जिल्ह्यात जळगाव शहरातील समांतर रस्त्यासारख्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्देवी आहे. महाजनांसाठी किरकोळ काम आहे. करून टाका, असा टोला लगावला. गिरणा खोºयाचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात आहे. काही झाले तरी नारपारचे पाणी, गिरणा खोºयातील पाण्यावरील हक्क सोडणार नाही, असा इशारा दिला.१९३टीएमसी पाणी तापी खोºयात आले. त्यापैकी ९१ टीएमसी पाणी अडविले आहे. मात्र आजही १०२ टीएमसी पाणी आजही गुजरातमध्ये जात आहे. जलसंपदामंत्री जिल्ह्यातलेच आहे. त्यांनी ठरविले तर पाणी अडविणे शक्य होते, अशी टीका केली.गुलाबराव पाटलांची नक्कलभुजबळ म्हणाले की, गुलाबराव पाटील हे देखील माझे मित्र आहेत. बोलतात सुंदर, असे सांगत त्यांचीही त्यांनी नक्कल करीत खिल्ली उडविली.३१ डिसेंबरला गडबड झालीजळगाव पोलीस अधीक्षकांनी ३१ डिसेंबरला केलेल्या कारवाईचा उल्लेखही भुजबळ यांनी केला. ते म्हणाले की, पोलीस खूप दबावात आहेत. ३१ डिसेंबरला खूप गडबड झाली. एस.पी., डीवायएसपी चांगले आहेत. बरोबर मोठे मासे पकडले. मात्र कोर्टात नेता-नेताच खूप दबाव आला. मग पकडलेल्या माणसांच्या जागी दुसरी माणस उभी करावी लागली. माणसाला माणूस, नगाला नग देतादेता नाकीनऊ आले, असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पसरला.व्यासपीठावर जिल्हा प्रभारी व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, महिला राष्टÑीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार इश्वरलाल जैन, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अभिषेक पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश देसले यांनी केले.फौजीया खान, चित्रा वाघ, जयदेव गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गुलाबराव देवकर यांनीही आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांच्यावर तसेच युती शासनावर टीका केली.

टॅग्स :Politicsराजकारण