‘त्या’ मनपा अधिकाऱ्यांना घातला भाजपचा गमछा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST2021-02-26T04:22:24+5:302021-02-26T04:22:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजप कार्यालयात बुधवारी स्थायी व महासभेच्या नियोजनासाठी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मनपा अधिकारी उपस्थित राहिल्यामुळे ...

The BJP slammed the Municipal Corporation officials | ‘त्या’ मनपा अधिकाऱ्यांना घातला भाजपचा गमछा

‘त्या’ मनपा अधिकाऱ्यांना घातला भाजपचा गमछा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजप कार्यालयात बुधवारी स्थायी व महासभेच्या नियोजनासाठी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मनपा अधिकारी उपस्थित राहिल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मनपा अधिकाऱ्यांना भाजपचा गमछा घालत, या कृतीचा अनोख्यापध्दतीने निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या समस्यांकडे वेळ द्यायला अधिकाऱ्यांकडे वेळ नसतो, अन‌् भाजपच्या बैठकांना हजेरी लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ कसा येतो, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

महापालिकेची स्थायी समितीची सभा संपल्यानंतर मनपाच्या सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या बैठकीत हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना थांबवून त्या अधिकाऱ्यांना भाजपचा गमछा घालण्यात आला. नगररचना विभागाचे अभियंता शकील शेख, शहर अभियंता अरविंद भोसले यांना थांबवून भाजपचा गमछा घालण्यात आला. प्रतिकात्मक पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश करुन, अधिकाऱ्यांचा भाजप पक्ष कार्यालयात उपस्थित राहिल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, भाजपच्या दावणीला बांधल्यासारखे काम न करता जनतेच्या कामांना वेळ द्या, तसेच याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

Web Title: The BJP slammed the Municipal Corporation officials