शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

By विलास बारी | Updated: April 3, 2024 12:04 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024:

- विलास बारीजळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील व भाजपचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख करण पवार यांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्याची खेळी करीत, उद्धवसेनेने भाजपसमोरील डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे भाजपला आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रारंभी वाटली होती तेवढी सोपी राहिली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजप एकतर्फी विजय खेचून आणत आहे. 

तिकीट कापल्याने भाजपमध्ये नाराजी     यावेळी भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. ती नेमकी हेरत उद्धवसेनेने या मतदारसंघात सक्षम पर्यायाचा शोध सुरू केला होता. 

गिरीश महाजन, मंगेश चव्हाण यांची डोकेदुखी वाढणार !मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याची आणि त्यामुळे नाराजी वाढल्याची भाजपमधील अनेकांची भावना आहे. पाटील व पवार यांचा समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश झाल्यास भाजपच्या या दोन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे भाजपमधील खडसे समर्थक सक्रिय झाल्याची डोकेदुखी वेगळीच असेल.

समीकरण बदलणार-खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांनी मंगळवारी खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. उभय नेते बुधवारी `मातोश्री’वर शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.-नव्याने तयार होणाऱ्या या समीकरणामुळे लढतीचे चित्र बदलू शकते. उद्धवसेनेने स्वत: उन्मेष पाटील किंवा त्यांच्या अर्धांगिनी संपदा पाटील अथवा करण पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी लढत तेवढी सोपी राहणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jalgaon-pcजळगावBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४