संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:00+5:302021-09-22T04:20:00+5:30
जळगाव : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात झालेल्या विद्युत वितरण कंपनीच्या एका कार्यक्रमात संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनेचा भारतीय जनता पार्टी ...

संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा भाजपने केला निषेध
जळगाव : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात झालेल्या विद्युत वितरण कंपनीच्या एका कार्यक्रमात संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनेचा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाने निषेध केला आहे तसेच त्याविरोधात उपस्थित लोकप्रतिनिधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली. भाजप अनुसुचित जाती मोर्चाने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनदेखील केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की, विद्युत वितरण कंपनीच्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. त्यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीचा अनादर करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी माजी महापौर सीमा भोळे, भाजप गटनेता भगत बालाणी, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल, महानगराध्यक्ष लता बाविस्कर, प्रशांत निकम, धनराज बावस्कर, विनोद साबळे, राहुल तायडे आणि इतर उपस्थित होेते.
फोटो - निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देताना माजी महापौर सीमा भोळे, भगत बालाणी, विकास अवसरमल, लता बाविस्कर, प्रशांत निकम, धनराज बावस्कर आणि इतर.