BJP office in Muktainagar will be NCP office | मुक्ताईनगरचे भाजप कार्यालय  होणार राष्ट्रवादीचे कार्यालय

मुक्ताईनगरचे भाजप कार्यालय  होणार राष्ट्रवादीचे कार्यालय

मुक्ताईनगर :  माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालयाचे बॅनर काढून कुलूप लावण्यात आहे. लवकरच हे कार्यालय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या फलकासह दिसून येणार आहे.
एरव्ही खडसे शहरात आले तर जिल्हा बँक शाखे शेजारील या कार्यालयात येऊन बसतात. अनेक वर्षांपासून भाजपा कार्यकर्त्याची नाळ या कार्यालयाशी जुळलेली आहे. निवडणुकांच्या प्रचाराचे नियोजन येथूनच होत होते. आता खडसे राष्ट्रवादी पक्षात गेल्याने या कार्यालयाचे रुपडेही बदलणाऱ आहे. या कार्यालया वरील भाजपचे फलक काही दिवसांपूर्वीच  काढले गेले आहे. सध्या नाथाभाऊ समर्थक मुंबई गेल्याने दोन दिवसां पासून कार्यालय हे कुलूप बंद आहे. कार्यकर्ते  परततील तेव्हा कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक लागून कार्यालय पुन्हा सुरू होईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: BJP office in Muktainagar will be NCP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.