शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 05:36 IST

लोकप्रतिनिधीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुक्ताईनगर (जि. जळगाव) : एक उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजपच्या नेत्याच्या कन्येची व तिच्या मैत्रिणींची जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई यात्रोत्सवात काही जणांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रविवारी सात जणांवर मुक्ताईनगर पोलिसांत आयटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात किरण माळी (२१) आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे.

आरोपींना हटकणाऱ्या सुरक्षारक्षक पोलिसालाही दमदाटी केली होती. त्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला. संशयितांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी मुलींसह रविवारी सकाळी मुक्ताईनगर ठाणे गाठले होते.

यात्रोत्सवात काही तरुणांनी या मुलींचा पाठलाग केला. मुली पाळण्यात बसल्या असताना त्यांची छेडछाड केली. मोबाइलमध्ये व्हॉट्सॲप कॉलसह चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार आहे.  एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता ७५(१), ७८(२), ७९,१८९ (२), पोक्सो ॲक्ट ८, १२ आयटी ॲक्ट ६६(इ) कलमान्वये मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसात आरोपींविरुद्ध पोक्सो व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक तर स्थानिक पोलिसांची दोन अशी तीन पथके रवाना झाली आहेत.

पीडितेची ओळख उघड करणार नाही 'लोकमत' 

या प्रकरणात पीडितेची ओळख उघड न करण्याच्या भूमिकेशी 'लोकमत' कटिबद्ध आहे. कारण, पीडित मुलगी अल्पवयीन आहे आणि या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 'लोकमत' महिलांची गोपनीयता आणि कायद्याचा सन्मान करते. 

कोणीही असले तरी कारवाई होणारच : मुख्यमंत्री

कुठल्याही नेत्याने कारवाई करू नका असे म्हटलेले नाही. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे प्रकार खपवून घेणार नाही. कोणीही असले तरी कारवाई होणार आणि केलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, या छेडछाड प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

त्यांना जरब बसायला हवी

हा फक्त आमच्या मुलीचाच प्रश्न नाही तर मुलींच्या सुरक्षिततेचा विषय आहे. मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना जरब बसायला हवी. त्यासाठी आपण स्वतः मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेलो अशा भावना पीडित मुलीच्या पालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.

आरोपीला विचारला जाब

या प्रकरणात शिंदेसेनेच्या एका माजी नगरसेवकाचाही आरोपींमध्ये समावेश आहे. त्याला पीडितेच्या पालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी फोन करून जाब विचारल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा